ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तक

पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळा पाडळोशी येथे बालबाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद

  • पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, शिक्षक पालक तसेच ग्रामस्थांनी खरेदीचा लुटला आनंद

पाटण (सातारा) । कांचन सुतार । महाईन्यूज ।

पाटण तालुक्यातील येथील जि. प. प्राथमिक शाळा पाडळोशी येथे विविध शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पनांच्या पंखांना बळ देण्यासाठी तसेच सामाजिक जाणिव दृढ करण्यासाठी बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास ग्रामस्थांसह, पालक-शिक्षक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थांनी या बालबाजरामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. विशेष बाब म्हणजे या बालबाजारात भाजीपाल्यासह विविध वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होत्या. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शिक्षक, पालकांसह ग्रामस्थांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.

मंगळवारी, (दि. 17 जानेवारी) रोजी पाडळोशी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी हा बालबाजार भरविण्यात आला. हा बाजार पाहण्यासाठी पाडळोशी गावाशेजारील विविध गावातील प्राथमिक शाळांनी हजेरी लावली. यामध्ये प्राथमिक शाळा धायटी, प्राथमिक शाळा नारळवाडी, प्राथमिक शाळा तावरेवाडी, तसेच अंगणवाडी शाळांनी उपस्थिती दर्शविली. या शाळांतील चिमुकल्यांनी तसेच शिक्षकवृंदांनी खरेदीचा आनंद लुटला.

पाडळोशी गावच्या नवनिर्वाचित सरपंच अलकाताई तावरे यांनी या बालबाजारास सदिच्छा भेट दिली. शाळेच्या उपक्रमाबाबत विद्यार्थी, शिक्षकांचे कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सदस्या तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होता.

जि. प. प्राथमिक शाळा पाडळोशीच्या वतीने राबविण्यात आलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनांना तसेच भावविश्वाला निश्चितच बळ देणारा ठरणार आहे. समाजभान जपताना, ग्रामस्थ तसेच गावाप्रती असलेली जाणिव यातून विद्यार्थ्यांना दैनदिन, व्यवहारी जीवनात उपयोगी पडणार आहे. हा उपक्रम राबविणार्या सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन आणि कौतुक.
-अलकाताई तावरे, नवनिर्वाचित सरपंच, पाडळोशी, ता. पाटण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button