breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Chinchwad Assembly Bypoll-election: शहराला आध्यात्मिक विचारांचा, तो जपण्याचा संकल्प : अश्विनी जगताप

पिंपरी: शहरातील गणेश भक्तांची आणि भाऊंची भक्तिभावाची नाळ जोडली गेली. आपल्या शहराला आध्यात्मिक विचारांचा वारसा आहे. तो जपण्याचा भाऊंनी कायम प्रयत्न केला. हाच वारसा माझ्याकडूनही जपला जावा यासाठी मोरया गोसावी महाराजांचे आशीर्वाद घेतले, अशा भावना भाजपा+ बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल्या.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी चिंचवड गाव येथील मोरया गोसावी मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींचे दर्शन घेतले.

अश्विनी जगताप म्हणाल्या की, चिंचवडगाव परिसरात प्रचारादरम्यान आज संकष्ट चतुर्थी निमित्त पिंपरी चिंचवडकरांचे आराध्य दैवत संत मोरया गोसावी महाराज यांचे दर्शन घेतले. तसेच देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री.मंदारदेव महाराज यांची भेट घेतली. आदरणीय भाऊंनी पाठपुरावा करून मोरया गोसावी देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला.

दरम्यान, चिंवडगावातील विविध ठिकाणी जाऊन अश्विनी जगताप यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. त्याप्रसंगी चिंचवड परिसरातील मा.नगरसेवक, भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button