breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी खास रणनिती

पुणे : पुण्यातही प्रचार शिगेला पोहोचला आहे. घराघरात प्रचार करण्यासाठी भाजपने विशेष रणनिती आखली आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भाजपकडून ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात ३ लाख घरांमध्ये वाटणार एक विशेष पत्रकं वाटली जाणार आहेत. ६ एप्रिलला भाजपचा वर्धापन दिन आहे. या दिवशी प्रत्येक घरात भाजप वाटणार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचं पत्रक वाटणार आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील या ‘घर चलो अभियान’ अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदारदेखील घरोघरी जात पत्रकं वाटणार आहेत. १० ते १२ लाख नागिरकांना भाजप पत्रक देणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपने नवी रणनीती आखली आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आम्ही ‘घर चलो अभियान’ आम्ही राबवत आहोत. ६ एप्रिलला प्रत्येक घरात आम्ही पत्रकं वाटणार आहोत, असं धीरज घाटे म्हणाले.

हेही वाचा – हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के

भाजपचे पुणे शहरात मतदान वर्षानुवर्ष पुणेकर भाजपला मतदान करतात. आमच्याकडे अजितदादांसारखं तगड नेतृत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतकं चांगलं काम करत आहेत. आरपीआयची ताकद आमच्यासोबत त्यामुळे हे सगळे एकत्रित मिळून मुरलीधर मोहोळ यांना खासदार करतील. मुरलीधर मोहोळ यांना मोठे मताधिक्य राहील. २० ,२१ एप्रिल नंतर पुणे लोकसभेचा फॉर्म भरला जाईल. महायुतीचे सर्व नेते मोहोळ यांचा फॉर्म भरायला उपस्थित राहतील, असंही धीरज घाटे म्हणाले.

देशात एकच पॅटर्न सुरू आहे, तो म्हणजे मोदी पॅटर्न… मोदी पॅटर्न समोर बाकीचे सगळे पॅटर्न फिके आहेत. पुण्यात केवळ मोदीजींचाच पॅटर्न चालेल. देशातल्या जनतेला मोदीजींमध्ये आश्वासक चेहरा दिसतो. म्हणून मोदी पुन्हा निवडून येतील आणि पंतप्रधान होतील, असा विश्वास धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button