ताज्या घडामोडीमुंबई

संजय राऊतांच्या आरोपांवर सोमय्यांचे थेट उत्तर; आव्हान देत म्हणाले…

मुंबई|राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप हा संघर्ष अधित तीव्र होत आहे. मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यानंतर आघाडीतील नेते संतप्त झाले आहेत. संजय राऊत यांनीही याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. मात्र, हे पैसे जमा केलेच नाहीत, असा दावा राऊत यांनी केला, राऊतांच्या या आरोपांवर किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, राऊतांचा थेट आव्हानही दिलं आहे.

‘आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले. कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी ५७ कोटी रुपये जमा केले. मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसंच, ‘या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. राऊतांच्या या आरोपांवर आता सोमय्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. मी काही घोटाळा केल्याचा संशय असेल तर आरोप करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावेत,’ असं आव्हान सोमय्यांनी राऊतांना दिलं आहे.
‘ईडीच्या कारवाईमुळं संजय राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करत आहेत. संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी जानेवारी २०२१मध्ये एक कंपनी रजिस्टर झाली होती. त्यांनंतर सुजीत पाटकर यांनी ती टेकओव्हर केली आणि कोविड सेंटरसाठी टेंडर भरलं, असा दावा सोमय्यांनी केला आहे. तसंच, ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत त्यामुळं राऊत चवताळले आहेत,’ असा टोलाही सोमय्यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button