breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थापत्य विभागाच्या बड्या अधिका-यांचा वाढदिवस नगरसेवकांकडून धुमधडाक्यात साजरा

 केक कापून, पुष्पगु्च्छ देवून अधिका-यांवर नगरसेवकांकडून शुभेच्छांचा वर्षाव 

पिंपरी – श्रीमंत महापालिकेतील स्थापत्य विभागाच्या एका बड्या अधिका-यांवर सर्व पक्षीय राजकीय नेत्यांची सतत कृपादृष्टी लाभलेली आहे.  सत्ता कोणाचीही येवो, चलती मात्र, त्या अधिका-याची कायम असते. कारण,  महापालिकेत एका बड्या अधिका-यांचा वाढदिवस आज (शुक्रवारी) त्यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.  विशेषताः हा केक महापालिकेतील राष्ट्वादी काॅग्रेसच्या विद्यमान स्थायी समिती सदस्य असलेल्या नगरसेवकांने आणला होता. त्यामुळे राष्ट्रवादी असो, या भाजप… त्या अधिका-याची राजकीय पदाधिका-यांशी असलेल्या जवळीकतेमुळे व प्रेमापोटी महापालिकेतही अधिका-यांचे वाढदिवस साजरे होवू लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील पंधरा वर्षांत राष्ट्रवादी काॅग्रेसची सत्ता होती. परंतू, महापालिका सार्वत्रिक निवडणूनकीत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपने सत्ता काबीज केली आहे. तरीही त्या अधिका-यावर विद्यमान सत्ताधा-यांचीही कृपादृष्टी कायम आहे. तसेच यापूर्वी त्या अधिका-यांने स्थानिक गाववाल्यांशी पै-पाहूण्यांचे लांगेबांधे सांगून पिंपरी-चिंचवडमधील राजकीय लोकप्रतिनिधींशी चांगलेच ऋणानुबंध वाढविले आहे. त्यामुळे त्या बड्या अधिका-यांशी सगळ्याच पक्षातील नगरसेवक, राजकीय नेतेमंडळीचे चांगले संबंध प्रस्थापित झालेले आहेत.

महापालिकेच्या स्थापत्य विभागातील त्या बड्या अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठे प्रकल्प राबविले आहेत. ते प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राबविल्यामुळे त्या- त्या प्रकल्पावर शहरातील करदात्या नागरिकांचा पैशा पाण्यासारखा खर्च झालेला आहे. त्या अधिका-यांच्या चुकीच्या कामाला अनेकांनी विरोध दर्शवून चाैकशी मागणी केली आहे. परंतू, संबंधित अधिका-याला पाठिशी घालून चुकीची कामे दडविली गेली आहेत. केवळ राजकीय नेत्यांच्या पाठबळावर स्वतांच्या कुबड्या भरण्याचे काम आजपर्यंत त्या अधिका-याने केले आहे. तसेच त्या अधिका-यांने वारेमाप स्थावर व जंगम मालमत्ता मिळविली आहे. त्या अधिका-यांच्या संपत्तीची चाैकशी करावी, अशी मागणी देखील सत्ताधारी भाजपच्या विद्यमान सरचिटणींसानी मुख्यमंत्र्याकडे केली होती. परंतू, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिका-याला पाठिशी घातल्यामुळे त्या अधिका-यांची चाैकशी होवू शकलेली नाही.

दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य विभागातील त्या बड्या अधिका-यांचा वाढदिवस शुक्रवारी त्यांच्याच कार्यालयात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या स्थायी समिती सदस्याने त्या अधिका-यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक व पुष्पगुच्छ आणला होता. त्यामुळे संबंधित बड्या अधिका-यांने कितीही मोठेमोठे प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राबवून महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांला चुना लावला, तरीही संबंधित अधिका-याला राजकारणी मंडळी पाठिशी घालून त्याच अधिका-यांचे गोडवे गाऊ लागल्याचे दिसून येत आहे. एकंदरित महापालिकेत अधिका-यावरील प्रेमापोटी त्यांचे वाढदिवस आता नगरसेवक साजरे करु लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button