breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भररस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण

पिंपरी – भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दाम्पत्याला रस्त्यात अडवून सायंकाळी बेदम मारहाण केली. ५ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता ताजणे वस्ती, पुनावळे येथे ही घटना घडली.

रेश्मा जुबेर अत्तार (वय ३०, रा. जांबे नेरे फाटा, ता. मुळशी) यांनी याबाबत रविवारी (८ नोव्हेंबर) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश कदम, देवा जमादार (दोघे रा. डांगे चौक), असिफ शेख (रा. भुजबळ वस्ती, पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्तार आणि त्यांचे पती ५ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता भाजी घेण्यासाठी रिक्षातून जात होते. त्या वेळी आरोपी कारमधून जात होते. आत्तार यांना पाहिल्यानंतर आरोपींनी अत्तार यांच्या पतीला आवाज देऊन थांबण्यास सांगितले. सकाळी झालेल्या वादाच्या कारणावरून तिघांनी मिळून अत्तार आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. अत्तार यांच्या पतीला लोखंडी रॉड आणि अत्तार यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. यात अत्तार यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button