breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मृती मानधना बेंगरूळू संघात तर मुंबईकडे हरमनप्रीत कौर

स्मृतीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४० कोटींना संघात घेतले

WPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. हा लिलाव मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू आहे. यामध्ये भारतीय महिला संघाची फंलदाज स्मृती मानधना हिच्या नावाने सुरूवात करण्यात आली. स्मृतीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४० कोटींना संघात घेतले आहे.

स्मृती मानधना हिची मुळ किंमत ५० लाख रूपये होती. स्मृती साठी जवळपास सर्वच संघाने बोली लावली होती. मात्र अंतिम वेळी बंगरूळने ३.४० कोटींना विकचत घेतले. आत्तापर्यंत सर्वात जास्त स्मृतीला बोली लागली आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला मुंबई इंडियन्सने १.८० कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाची खेळाडू अॅश गार्डनर हिला गुजरात संघाने ३.२० कोटी रूपयांना विकत घेतले आहे. सर्वात महाग परदेशी खेळाडूमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाची खेळाडू एलिस पेरी हिला १.८० कोटी रूपयाना आरसीबीने विकत घेतले आहे. दरम्यान इतर खेळाडूंचा लिलाव सुरू आहे.

दरम्यान, महिला प्रीमीयर लीगच्या पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनौ, दिल्ली आणि बेंगळुरू या संघांचा समावेश आहे. या लिलावात तब्बल ४०९ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त भारतीय खेळेडूंचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button