breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायचाय : विरोधी पक्षनेते अजित पवार

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

पिंपरी । प्रतिनिधी 

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काय होणार? आम्ही व्यवस्थितपणे जागांचे वाटप करू. सर्वांचं समाधान करू. ज्याची जशी-जशी ताकद असेल, तसे उमेदवार देऊ. पण आता आपल्यायला एकजूट दाखविल्याशिवाय पर्याय नाही. आपल्यामध्ये मताची विभागणी होता कामा नये. एक-एक मत महत्वाचे आहे. गाफील राहू नका. आपल्यात अंतर पडू देवू नका. कोणी रुसू ,फुगू, नाराज होऊ नका, आपल्यायला जनतेला दाखवायचं. दोन्ही जागा निवडणून आणायच्या आहेत. इजा झाला, बिजा झाला आता तिजा दाखवायचा यांना. गद्दारांनी जे गालबोट लावलय त्यांना धडा शिकवायचा आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराकरिता वाल्हेकरवाडीत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्याचेआयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे, आरपीआयचे राजेंद्र गवई, सचिन खरात, आमदार आण्णा बनसोडे, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, शिवसेना बाळासाहेबांनी काढली, ती मराठी माणसांना आधार देण्यासाठी. शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली. पानपट्टी, वडाप चालवणारे बाळासाहेबांमुळे आमदार, खासदार झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोन बंड झाले. मात्र गद्दारी करणारे पडले. त्यानंतर तिसऱ्यांदा जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड करुन महाविकास आघाडी सरकार पाडले. उद्धवसाहेबांना त्यांच्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. आपल्या सगळ्यांची आता सटकली पाहिजे. त्याचा बदला या निवडणुकीत शिवसैनिकांनी घ्यायचा आहे. 

सटरफटर लोकांना वाटते मीच शिवसेनाप्रमुख…

अजित पवार म्हणाले की, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी माझ्यानंतर माझी जागा उद्धव सांभाळतील. आदित्य ठाकरे युवा नेतृत्व म्हणून काम करतील, असे सांगितले होते. आता हे सटरफटर स्वतःला शिवसेना प्रमुख समजू लागले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना हीच खरी उद्धव आणि आदित्य यांची शिवसेना आहे. त्यांना मानणारा मतदार आहे. त्या मतदाराला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांचे काम करायला लावायचे आहे. मतपरिवर्तन करायचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button