breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एका महिन्यात नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घ्या, आयुक्तांचे फर्मान

  • सर्व्हेक्षणानंतर मिळकती आढळल्यास कर्मचा-यांवर कारवाई
  • लवकरच भौगोलिक सूचना प्रणालीद्वारे (जीआयएस) मिळकतीचे सर्व्हेक्षण

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मिळकती ह्या विना नोंदणी आहेत. तसेच त्या मिळकतीच्या क्षेत्रफळात, वापरात बदल देखील झाले. त्या मिळकतीच्या नोंदी संबंधित मालकांनी केलेल्या नाहीत. तसेच महापालिकेचे आर्थिक नूकसान होत आहे. त्यामुळे एका महिन्यात 16 करसंकलन क्षेत्रातील सर्व मिळकतींचा शोध घ्यावा, आणि शंभर टक्के सर्व्हेक्षण करुन मिळकतींची मिळकत कर आकारणी कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या 16 करसंकलन कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना 25 जूनपर्यंत सर्व्हेक्षणातून मिळकती शोधून नोंदी करण्यास सांगितले आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भौगोलिक सूचना प्रणालीद्वारे (जीआयएस) मिळकतींचे सर्व्हेक्षण नजीकच्या कालावधीत सुरु करण्यात येणार आहे. त्यापुर्वी शहरातील सर्व निवासी, निवासेत्तर, आकारणीस पात्र नवीन मिळकती, वापरात बदल, क्षेत्रफळात बदल झालेल्या मिळकतींचे सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे.

शहरातील निवासी, निवासेत्तर नवीन, वाढीव व वापरात बदल झालेल्या मिळकती यांचे स्थळावर जावून पाहणी करुन त्याबाबत पंचनामा करुन मिळकत कर आकारणी नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या परंतू, नोंदी नसलेल्या मिळकती कोणत्या सालापासून अस्तित्वात आहेत. याविषयी मिळकतधारकांकडून लगेचच कागदपत्रे न मिळाल्यास पंचनामा करुन त्यानूसार मिळकतींची मिळकतकर आकारणी करण्यात येईल.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 150 अ मधील तरतुदीनूसार करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणामध्ये मिळकत कर आकारणी विना एकही मिळकत राहणार नाही. याबाबत सहायक मंडलाधिकारी यांनी प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत सर्व्हेक्षण मुदतीअखेर प्रमाणपत्र सादर करावयाची आहेत.

दरम्यान, मिळकतीची कर आकारणी न झालेचे आढळून आल्यास अथवा त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कर आकारणी अभावी झालेल्या आर्थिक नुकसानीची वैयक्तीक जबाबदारी संबंधित कर्मचा-यावर निश्चित करण्यात येईल. तसेच आर्थिक नुकसान भरपाई झाल्याने त्या कर्मचा-यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button