पिंपरी / चिंचवड

घरासमोर बसलेल्या बहिणीला बेदम मारहाण ; लहान भावासह मेहुण्यावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

भावाच्या घरासमोर बसलेल्या महिलेला भावाने बेदम मारहाण केली. यासाठी महिलेच्या मेहुण्याने देखील साथ दिली. याप्रकरणी लहान भाऊ आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणे एक वाजता गोडुंब्रे येथे घडली.

सहदेव ज्ञानोबा मोहिते (वय 30, रा. साळूंब्रे, ता. मावळ), सुभाष चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या भावाच्या अंगणात बसल्या होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या त्यांच्या आरोपी लहान भावाने त्यांना ‘तू कशाला माझ्या दारात आली. ताबडतोड उठून जा’ असे म्हणून फिर्यादी यांच्या कमरेवर लाथ मारली. त्यावेळी फिर्यादी उठून बाहेर जात असताना फिर्यादी यांचा मेहुणा आरोपी सुभाष याने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीचे केस ओढून ठेवले. आरोपी सहदेव याने दगडाने मारून फिर्यादीस जखमी केले. यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी चक्कर येऊन पडल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button