पिंपरी / चिंचवड

नातेवाईकांच्या लग्नात सासरे आणि जावयाचे भांडण; सास-याला बेदम मारहाण करून बघून घेण्याची धमकी

पिंपरी l प्रतिनिधी

सासरे, सासू आणि त्यांचा जावई व त्यांचे कुटुंबीय मोशी येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले असताना मुलीला का नांदवत नाहीत, अशी सास-याने जावयाला विचारणा केली असता जावयाने सास-याला बेदम मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सास-याने जावई आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 25) सायंकाळी साडेसहा वाजता साधुराम मंगल कार्यालय मोशी येथे घडला.

उत्तम ज्ञानदेव पवार (वय 50, रा. श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन लक्ष्मण गाडेकर (वय 32, रा. चिंचवड. मूळ रा. श्रीगोंदा अहमदनगर), लक्ष्मण रामजी गाडेकर (वय 58), अर्चना लक्ष्मण गाडेकर, इतर दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईकाच्या लग्नासाठी मोशी येथील साधुराम मंगल कार्यालयात आले होते. आरोपी नितीन हा फिर्यादी यांचा जावई आहे. तो फिर्यादी यांच्या मुलीला नांदवत नाही. त्यावरून फिर्यादी आणि आरोपींचा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही शिवीगाळ करून आरोपी अर्चना गाडेकर हिने कानाखाली मारली. जावई नितीन याने फिर्यादी यांना ‘तुला बघून घेतो. सोडणार नाही’ अशी धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button