breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ‘‘रंगवा तुमचा कागदी गणपती’’ उपक्रम, गायक राहुल देशपांडे यांचा सहभाग

पुणे : पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या रंगवा तुमचा कागदी बाप्पा या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देणाऱ्या उपक्रमात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, नेहा आणि रेणुका सहभागी झाले होते.

गायक राहुल देशपांडे म्हणतात की, शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्सच्या आवारात संपन्न झालेल्या उपक्रमात आज विद्यार्थ्यांसोबत कागदी बाप्पा स्वतः रंगवताना एक वेगळीच उर्जा जाणवली. या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून त्या ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर अपसायकल करून वापरला आहे. या मूर्ती वजनाने हलक्या असतात आणि जलरंगांनी रंगवता येतात अशी माहिती मला शोभना हडप आणि संजीव पवार यांनी दिली तेंव्हा आपण एका चांगल्या उपक्रमाचा भाग झालो याचा  आनंद वाटला. यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button