breaking-newsमनोरंजन

‘स्त्री’मुळे श्रद्धा झाली ‘इन्स्टाक्वीन’

कमी कालावधीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ट्रेंडिंगमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला स्त्री हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा गाजला असून या चित्रपटाने १५० कोटींचा गल्ला जमविला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे श्रद्धाच्या लोकप्रियतेतही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी श्रद्धा इन्टाग्रामवर टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री ठरली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियनुसार, ‘स्त्री’ मधील श्रध्दा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

गेल्या काही दिवसापासून निक-प्रियांका या जोडीची डिजीटल विश्वात चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे प्रियांका गेले कित्येक दिवस इंटरनेटवर धुमाकूळ घालत होते. परंतु स्त्री या चित्रपटामध्ये श्रद्धाने केलेल्या अभिनयामुळे ती रातोरात हिट झाली आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्यामुळे इन्स्टावर तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. यात तिने प्रियांकालाही मागे टाकलं आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. डिजीटल विश्वात सध्या श्रध्दा आणि प्रियंका चोपडाशिवाय ‘सुई धागा’ चित्रपटामुळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमुळे राधिका आपटेचा चाहतावर्ग खूप आहे. तसेच ‘मणिकर्णिका’ चित्रपटामुळे कंगना रनौतसुध्दा चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

मात्र नंबर वन स्थानी पोहोचलेल्या श्रध्दाने १०० गुणांसह डिजीटल विश्वात या सर्व अभिनेत्रींना मागे टाकले आहे. डिजीटल लोकप्रियतेत श्रध्दाच्यानंतर प्रियंका चोप्रा ८९ गुणांसह दुस-या स्थानावर, अनुष्का शर्मा ३६ गुणांसह तिस-या जागी, राधिका आपटे २६ गुणांसह चौथ्या पदावर तर कंगना रनौत २३ गुणांसह पांचव्या क्रमांकावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button