breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

द्विशतकासह शुबमनची सचिन, रोहित यांच्या यादीत एन्ट्री

द्विशतक करणारा शुबमन ठराला सर्वात तरूण खेळाडू

मुंबई : भारतविरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर शुबमन गिलने द्विशतक करत नवा विक्रम केला आहे. वयाच्या 23व्या वर्षी 200 ठोकणारा शुबमन सर्वांत तरुण द्विशतकवीर आहे.

शुबमनने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची धडाकेबाज खेळी केली. षटकार आणि चौकारांच्या जोरावर शुबमनने 28 चेंडूत 130 धावा केल्या आहेत. या खेळाच्या बळावर भारतीय संघाने 349 धावांचा डोंगर उभारला आहे. हे वनडे क्रिकेट मधील दहावे वैयक्तिक द्विशतक आहे. तर वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय पुरूष क्रिकेटर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 1000 धावा करणारा भारतीय क्रिकेटर शुभमन गिल ठरला आहे. शुबमनने फक्त 19 डावांमध्ये 1000 धावा पुर्ण केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, इशान किशन यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन द्वीशतक आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिलं द्विशतक झळकावण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंटुलकर यांच्या नावावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button