breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव; नीरज चोप्राच्या भाल्याची बोली सव्वा कोटींवर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा काल देशभरात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांना भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव कालपासून सुरू करण्यात आला. हा लिलाव येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ई-लिलावाची ही तिसरी फेरी असून त्यामध्ये टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी मोदींना दिलेल्या भेटवस्तूंसह एकूण १३३० भेटवस्तूंचा समावेश आहे. यातून मिळणारी रक्कम नमामी गंगे अभियानसाठी दिली जाणार आहे.

या भेटवस्तूंमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा भाला आणि पॅरालिम्पिक खेळांचे रौप्यपदक विजेते नोएडाचे जिल्हाधिकारी सुहास यतीराज यांच्या बॅडमिंटन रॅकेटचा समावेश आहे. त्यांच्या एलवाय रॅकेटसाठी बोली १० कोटींवर गेली आहे आणि नीरज चोप्राच्या भाल्याचीही बोली सव्वा कोटीपर्यंत पोहचली आहे. त्यानंतर बॉक्सर लव्हलिना बोर्गेहेनच्या ग्लोव्हजची बोली १ कोटी ८० लाखांच्या पुढे गेली आहे.

पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणाऱ्या सुमित अँटिलच्या भाल्याची बेस प्राइसही १ कोटी रुपये आहे. या लिलावात अवनी लेखराने स्वाक्षरी केलेल्या टी-शर्टचाही समावेश आहे, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाच्या स्टिकची,कांस्यपदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गेहेनच्या बॉक्सिंग ग्लोव्हजची आणिपॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कृष्णा नगरने स्वाक्षरी केलेल्या रॅकेटची मूळ किंमत ८० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.तसेच ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी pmmementos.gov.inवर नोंदणी करावी लागेल. या लिलावामध्ये अयोध्या राममंदिर,चारधाम,रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची प्रतिकृती शिल्प,चित्रे,वस्त्रे आदींचा समावेश आहे.यातील लहान आकाराचा सजावटीचा हत्ती ही २०० रुपये इतकी सर्वात कमी किंमत असलेली वस्तू आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button