breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साडेपाच कोटींच्या विकास कामांना स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी | महाईन्यूज

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी झालेल्या महापालिका कर्मचा-यांना मोहिम कालावधीत प्रतिदिन १५० रुपये भत्ता देण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली. या विषयासह विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५ कोटी ५४ लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची पहिली फेरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात आली तर दुसरी फेरी १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी महापालिका कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली आहे. घरोघरी भेटी देवून आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, संशयीत कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या व्यक्ती शोधुन काढणे, त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार करणे याबाबींचा मोहिमेत अंतर्भाव आहे.

या मोहिमेच्या अंमलबजावणीकरीता महापालिका कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली असून त्यांना मोहिम कालावधीत प्रतिदिन १५० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. यासाठीच्या खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र.२ मध्ये विविध स्थापत्य विषयक कामे करणेसाठी २५ लाख ८९ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button