breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड!

Sudha Murthy | इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड केल्याचा मला खूप आनंद झाला आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधा मूर्ती यांनी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान दिलं आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती हा आपल्या नारी शक्तीचा एक सशक्त पुरावा आहे. आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. सुधा मुर्ती यांची राज्यसभेतील उपस्थिती महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी मी सुधा मूर्ती यांना शुभेच्छा देतो.

हेही वाचा    –      काँग्रेस लोकसभेच्या ३०० जागा लढवणार, महाराष्ट्रात किती जागा? 

सुधा मूर्ती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. सध्या मी भारतात नाही. पण महिला दिनानिमित्त हे माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. देशासाठी काम करणं ही एक नवी जबाबदारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केलं. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button