breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

धक्कादायक! ८९ वर्षीय आईचा मृतदेह घरात लपवून मिळवले ४३ लाख रुपये

नवी दिल्ली |

पैशासाठी माणूस काय करेल सांगता येत नाही. तो कुणाचा जीवही घेऊ शकतो. अवघ्या १०-२० रुपयांसाठी हत्या झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. अशातच ऑस्ट्रियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका ऑस्ट्रियन माणसाने त्याच्या आईच्या मृतदेह पैशांसाठी घरात राखून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या माणसानं आईला ममीफाय केलं. जेणेकरून तिला मिळणारे पैसे त्याला मिळत राहतील.

एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रियन पोलिसांना ८९ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. तो मृतदेह तिच्या मुलाने एक वर्षांपेक्षा जास्त काळ तळघरात राखून ठेवला होता. या महिलेच्या मृत्यूनंतरही तिला मिळणारे पैसे मुलाला मिळत होते. स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या या महिलेचा गेल्या गेल्यावर्षी जूनमध्ये मृत्यू झाला आणि तिचा ६६ वर्षांचा मुलगा ऑस्ट्रियाच्या टायरॉल प्रदेशात त्यांच्या राहत्या घरी मृतदेहासोबत राहत होता. चौकशीदरम्यान, त्या व्यक्तीने कबूल केले की तिच्या मृत्यूनंतर त्याने मृतदेह आईसपॅकने गोठवला आणि वास पसरू नये म्हणून तळघरात ठेवला. शरीरातील कोणतंही द्रव बाहेर पडू नये म्हणून त्याने मृतदेह पट्ट्यांमध्ये गुंडाळला. त्याने कचऱ्याने मृतदेह झाकून त्याचे ममीकरण केले होते, असे पोलिसांनी सांगितले. तर आरोपीने त्याच्या भावाला आई रुग्णालयात असल्याचा बनाव वर्षभर केला.

गेल्या वर्षभरात या मुलाला महिलेच्या पेंशनचे मिळणारे ४३.४ लाख रुपये मिळाले. याच दरम्यान, त्यांच्या घरी एक पोस्टमन आला. तो पोस्टमन नवीन असल्याने त्याने त्या महिलेला बघायचं असल्याचं सांगितलं. मुलाने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्या पोस्टमनने अधिकाऱ्यांना याबद्द्ल माहिती दिली. अधिकाऱ्यांनी या व्यक्तीच्या घरी येऊन चौकशी केली असता मुलाचं बिंग फुटलं आणि महिलेचा गेल्या एका वर्षापेक्षा अधिक काळ तळघरात ठेवलेला मृतदेह बाहेर आला. या व्यक्तीवर पैशांसाठी फसवणूक केल्याचा आणि मृतदेह लपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी कोलकाताच्या बेहला भागात अशाच एका घटनेत एका व्यक्तीने तीन वर्षांहून अधिक काळ आपल्या आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला होता. सुरुवातीला त्याने आपल्यापासून आईला दूर जाऊ द्यायचं नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः बेरोजगार असून आईच्या पेंशनवर जगत असल्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button