breaking-newsराष्ट्रिय

शोपियाँमध्ये हिज्बुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाने शोपियाँमध्ये एका गावात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या एनकाऊंटरमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडरही मारला गेला आहे. यासह सुरक्षा दलाने सरपंच अजय पंडित यांच्या हत्येचाही बदल घेतला आहे. सुरक्षा दलाने गेल्या एका महिन्यात 30 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियाँमध्ये 10 दिवसांत 17 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शोपियाँमध्ये तीन दहशतवादी मारण्यात आले. त्यापैकी एक हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हिज्बुलच्या ज्या दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती, त्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. 

ANI✔@ANI

Three terrorists were killed in the encounter. We will ask people, who are claiming to be their parents, to come and identify the bodies. It was a clean operation, there was no collateral damage: IG Police Kashmir, Vijay Kumar on encounter in Shopian. #JammuAndKashmir

View image on Twitter

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी, ‘चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून कारवाई सुरु आहे. घटना स्थळाहून शस्त्रास्त्र आणि दारुगोळादेखील जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

मध्यरात्री तुर्कवांगम येथे पोलिस, सेनेच्या 44RR आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. ज्या भागात दहशतवादी लपले होते, त्या भागात घेराव घालण्यात आला. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठीही सांगण्यात आलं मात्र त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button