breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘म्हाडा’च्या प्रकल्पातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेणार : शिवाजीराव आढळराव पाटील

महाळुंगे इंगळे येथील म्हाडा सिटी प्रकल्पाला भेट : रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या

पुणे | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत महाळुंगे इंगळे येथील प्रकल्पातील विविध समस्यांचा आढावा घेण्याकरिता येथील सदनिका धारकांना शब्द दिल्यानुसार सदर ठिकाणी भेट देऊन आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित रहिवाशांकडून त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या माजी खासदार तथा म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाणून घेतल्या.

या प्रसंगी सी.ओ अशोक पाटील साहेब, डेप्युटी सी.ओ मोहन बोबडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे वर्पे व महाळुंगे इंगळे गावच्या सरपंच अर्चनाताई महाळुंगकर, कार्यकारी अभियंता अनंत खेडकर, व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, येथील पाण्याची जटील समस्या लक्षात घेता मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. येथील विजेच्या समस्यांना लक्षात घेत चाकण जवळील १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे एक्सप्रेस फीडर बसविण्याची मागणी मी केली असून त्याद्वारे आवश्यक वीज येथे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच जलजीवन मिशन मधून पाणी पुरवठा व्हावा यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिलेल्या आहेत जेणेकरून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी दिला.

हेही वाचा      –        मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीत आता ‘मिठाचा खडा’

याशिवाय येथील म्हाडा सिटीत येण्यासाठी ३०० मीटर लांबीचा सोयीचा रस्ता झाल्यास तो मुख्य रस्त्याला जोडला जाऊन दळणवळणाची सुविधा मजबूत होईल. कोरोना काळामध्ये म्हाडाच्या घरांची दुरावस्था झाल्याने सदर दुरुस्तीकामांकरिता मंत्रालयातून विशेष निधी आणून काम करून घेणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. म्हाडाच्या घरकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी व्यक्तिश: लक्ष घालणार आहे, असे आश्वासन आढळराव पाटील यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button