breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

औंध ITI येथे ३३ व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक ते दोन वर्ष मुदतीच्या ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये १ हजार ६६४ प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून ११ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण अशी आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिवर्षी साधारणपणे दोन हजार रुपये खर्च येणार आहे.

एक वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम : कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन), फोटोग्राफर, सुईंग टेक्नोलॉजी, सेक्रेटरियल प्रॅक्टीस (इंग्रजी), मेकॅनिक डिझेल, स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट (इंग्रजी), शिट मेटल वर्कर, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, मेसन, कॉम्पुटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आणि प्लॉस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर.

दोन वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम : मशिनिस्ट, फीटर, मशिनिस्ट ग्राईंडर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक मशिन टुल मेन्टेनन्स, टर्नर, टूल ॲण्ड डायमेकर (डाईज ॲण्ड मोल्ड), टूल ॲण्ड डायमेकर (प्रेस टुल्स, जिग्ज आणि फिक्चर), ड्राफ्टसमन मेकॅनिकल, ड्राफ्टसमन सिव्हिल, इलेक्ट्रोप्लेटर, सर्व्हेअर, पेंटर (जनरल), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर, वायरमन आणि रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडीशनर टेक्निशियन.

प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. ११ जुलै पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची व १२ जुलै पर्यंत निश्चित करुन विकल्प भरण्याची संस्थेमध्ये सुविधा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शंभर विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले आहेत परंतु निश्चित करुन विकल्प भरलेले नाहीत त्यांनी विहित मुदतीत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या पसंतीक्रमानुसार विकल्प भरावेत.

हेही वाचा – ‘अजितदादा परत या, हवं तर मी राजकाण सोडतो’; जितेंद्र आव्हांडांचं भावनिक आवाहन

औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालू वर्षापासून एरोनॉटीकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्विपमेंट फिटर हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला आहे. हा व्यवसाय पुर्ण केल्यानंतर विमान कंपनीमध्ये तसेच वाहन उद्योगामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. डेसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीने नागपुर येथे नवीन शाखा स्थापन केलेली आहे. ही कंपनी आय. टी. आय. औंध, पुणे करीता तांत्रिक सहकार्य उपलब्ध करुन देणार आहेत.

स्टेनो (मराठी) हा व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, खेरवाडी, वांद्रे. मुंबई- ५ यांच्यामार्फत राबविण्याचे प्रस्तावित असून ऑफलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेशासाठी संस्थेत प्रत्यक्ष भेट देवून किंवा संस्थेच्या भ्रमणध्वनी हेल्पलाईन क्रमांक ८८५७९८४८२२ वर मार्गदर्शन घ्यावे. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून प्रवेश प्रक्रिया निश्चित करता येईल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button