breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा सचिन वाझेंकडून नाट्यरूपांतर

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरु आहे. तपासाचा भाग म्हणून सचिन वाझे यांना शुक्रवारी रात्री अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर आणण्यात आलं होतं. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएकडून या ठिकाणी नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाचा :-राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजार रुग्णांनी वाढ, 70 मृतांची नोंद

२५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ, कारमायकल रोडवर उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एनआयएने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून आपल्याकडे घेतलं असून तपास सुरु आहे.

एनआयएने सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत चालायला लावसं. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आलं. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आलं. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्य तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button