breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

टाटा एअरबस वादावर उतारा, अॅमेझॉनचं सर्वांत मोठे केंद्र ठाण्यात?

ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात असतानाच अॅमेझॉन समूहातील एका कंपनी ठाण्यात मोठा प्रकल्प उभारणार आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीने त्यासाठी १ हजार ८४० कोटी रुपयांची जागा खरेदी केली असून त्यासाठी १३० कोटींचं मुद्रांकशुल्क भरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कल्याण-भिवंडी-ठाणे या मेट्रो लाइनपासून हाकेच्या अंतरावर बाळकूम पाडा आहे. या बाळकूम पाडा येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बाळकूम पाडा येथील ६० एकर जागा १ हजार ८४० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. अनंता लॅण्डमार्क्स या कंपनीकडून ही जागा खरेदी करण्यात आली असून ही कंपनी कल्पतरू समूहाचा भाग आहे. येथे अॅमेझॉनकडून डेटा सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बाळकूम पाडा ही जागा मोक्याची आहे. कल्याण-भिवंडी-ठाणे ही मेट्रो लाईन आणि पुढे गायमुख-घाटकोपर-वडाळा हा मेट्रो मार्गही जोडण्यात आला आहे. तसंच, या मेट्रोद्वारे पवईमार्गे दहिसरपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे ही जागा हेरण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीला कंपनीकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रातील चार प्रकल्प आतापर्यंत महाराष्ट्रबाहेर गेले आहेत. यावरून राज्यातील राजकारणात कलगीतुरा रंगला आहे. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प राज्याबाहेर का जात आहेत, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. तर, राज्यात आणखी चांगले प्रकल्प येणार असल्याचा प्रतिदावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. असं असतानाच अॅमेझॉनचं केंद्र ठाण्यात येणार

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात असतानाच अॅमेझॉन समूहातील एका कंपनी ठाण्यात मोठा प्रकल्प उभारणार आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस या कंपनीने त्यासाठी १ हजार ८४० कोटी रुपयांची जागा खरेदी केली असून त्यासाठी १३० कोटींचं मुद्रांकशुल्क भरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कल्याण-भिवंडी-ठाणे या मेट्रो लाइनपासून हाकेच्या अंतरावर बाळकूम पाडा आहे. या बाळकूम पाडा येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बाळकूम पाडा येथील ६० एकर जागा १ हजार ८४० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. अनंता लॅण्डमार्क्स या कंपनीकडून ही जागा खरेदी करण्यात आली असून ही कंपनी कल्पतरू समूहाचा भाग आहे. येथे अॅमेझॉनकडून डेटा सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बाळकूम पाडा ही जागा मोक्याची आहे. कल्याण-भिवंडी-ठाणे ही मेट्रो लाईन आणि पुढे गायमुख-घाटकोपर-वडाळा हा मेट्रो मार्गही जोडण्यात आला आहे. तसंच, या मेट्रोद्वारे पवईमार्गे दहिसरपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे ही जागा हेरण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीला कंपनीकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रातील चार प्रकल्प आतापर्यंत महाराष्ट्रबाहेर गेले आहेत. यावरून राज्यातील राजकारणात कलगीतुरा रंगला आहे. महाराष्ट्रात येणारे प्रकल्प राज्याबाहेर का जात आहेत, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. तर, राज्यात आणखी चांगले प्रकल्प येणार असल्याचा प्रतिदावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. असं असतानाच अॅमेझॉनचं केंद्र ठाण्यात येणार असल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे टाटा एअर बस वादावर अॅमेझॉन केंद्र उतारा ठरणार का हे पाहावं लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button