breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

नाशिक – नाशिकमधील शिवसेना नगरसेविका सौ. सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या प्रभाग क्रमांक 22 बच्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका होत्या. शिवसेना पक्ष्याच्या सक्रिय सदस्यांपैकी एक अशी सत्यभामा गाडेकर यांची ओळख होती. कोरोनावर उपचार सुरू असताना नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाबळींची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता सत्यभामा गाडेकर यांच्या निधनाने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, 11 एप्रिल रोजी शिवसेनेच्याच नगरसेविका कल्पना पांडे यांचेदेखील कोरोनाने निधन झाले होते. गाडेकर यांच्या निधनानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button