breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला मनसेचा चाप; काही लाखांची बिलं केली माफ

कोरोनाच्या या ‘अस्मानी सुलतानी’ काळात मनसेचं कार्य वाखाणण्याजोगं

शहराध्यक्ष सचिन चिखलेंच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांची फौज ऐनवेळी शव उचलण्याचेही दाखवतेय धारिष्ट्य

पिंपरी / महाईन्यूज

सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाची स्थिती भयानक बनत चालली असून, दुसऱ्या लाटेत आलेल्या कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. शहरातील आरोग्य व्यवस्थेला कोरोनाने विळखा घातला असून, आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाअभावी रुग्णांचे हाल होऊन जीव जायला सुरुवात झाली आहे. कडक लॉकडाऊन असूनही रुग्ण संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. या कमतरतेबरोबरचं ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवतोय. मात्र, ही परिस्थिती सुधारण्याऐवजी सत्ताधारी भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीदेखील हतबल झाल्याचे शहरवासियांना पहावयास मिळत आहे. मात्र, अशा कठीण काळात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या स्वावलंबी बाण्याचा आदर्श घेऊन पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले व त्यांचा चमू एका खऱ्या योद्ध्याप्रमाणे कोरोना काळात शहरातील गोरगरीब, मध्यमवर्गी नागरिकांना ‘एक हात मदतीचा’ देताना दिसत आहे.

कुणी रुग्णालयात बेडसाठी मदत मागतोय तर कुणी व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजन, ‘रेमडेसिवीर’साठी तर, कुणी पोटाचं खळग भरण्यासाठी. ‘मनसे म्हटलं की मदत मिळणारच’; या आशेने नागरिक मदत मागतोय व ती त्याला मिळतीय देखील. त्यामुळेच या अशा ‘अस्मानी सुलतानी’ कठीण काळातही शहर मनसेच कार्य खरचं वाखाणण्याजोग म्हणायला हवं.

मनसेच्या या कार्यात शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्षा अश्विनीताई बांगर, शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, शहर सचिव व पालिका कर्मचारी सेना अध्यक्ष रुपेश पटेकर, अनिकेत प्रभु शहर सचिव, उपशहर अध्यक्ष विद्यार्थी सेना, सीमाताई बेलापुरकर शहर सचिव महिला सेना, अनिताताई पांचाळ उप शहर अध्यक्ष महिला सेना, राजु भालेराव शहर अध्यक्ष जनहित सेना, सुशांत साळवी शहर अध्यक्ष वाहतुक सेना, बाळा दानवले उप शहरअध्यक्ष पिं. चिं, राजु सावळे उप शहर अध्यक्ष पिं. चिं, विशाल मानकरी उप शहर अध्यक्ष पिं. चिं, दत्ता देवतरासे विभाग अध्यक्ष पिंपरी, मयुर चिंचवडे विभाग अध्यक्ष चिंचवड, अंकुश तापकीर विभाग अध्यक्ष भोसरी, अनुज महाजन उपाध्यक्ष वाहतुक सेना, मनसैनिकांचा सक्रीय सहभाग आहे.

यबाबत माहिती देताना शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही शेकडोंवरून हजारांवर आणि आता लाखांमध्ये पोहचली आहे. रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजन, ‘रेमडेसिवीर’ यांचा मोठा तुटवडा जाणवतोय. या कठीण काळात जनतेला सत्ताधारी पक्षापेक्षा मनसेकडून प्रचंड अपेक्षा आहेत. काम हाच मनसेचा अजेंडा आहे. त्या अनुषंगाने मनसैनिक हा कायम काम करत असतो. त्यामुळे लोकांचा मनसेवर प्रचंड विश्वास आहे. कोरोना काळात शहरवासीय सत्ताधारी पक्षाकडे न जाता मनसेच्या ज्या शाखा आहेत तिथे जातायत. सत्ता व पैसे नसतानाही मनसेच्या माध्यमातून अनेक कामे केली जात आहेत. ऐनवेळी कोरोनामृताचे शव उचलण्याचे धारिष्ट्यदेखील आम्ही दाखवत आहोत.

याआधी लॉकडाऊनच्या प्रथम टप्प्यात जनजागृती, अन्नधान्य वाटप, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत, सॅनिटाईझर- मास्क वाटप, कम्युनिटी किचन आदी विविध उपक्रमांतून नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली आहे. ‘आता प्रशासनाने पुन्हा लॉकडॉन-२ ची अंमलबजावणी केली आहे. पुन्हा आपण सर्वजन दूष्टचक्रात अडकलो आहोत. लोकांना कोविडच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मनसेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आमच्या मनसे शिलेदारांकडून सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण, लोकांना बेड, आयसीयू, ऑक्सिजन व्हँटिलेटर, रेमडिसिवर इंजक्शन, प्लाझ्मासाठी मदत केली जात आहे.

शहर सचिव व पालिका कर्मचारी सेना अध्यक्ष रुपेश पटेकर म्हणाले, कोविड रुग्णांना खासगी रुग्णालयांनी दिलेली अवास्तव बिलं कमी करून देण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील स्पंदन हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल, आयुष हॉस्पिटल, गुंजकर हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, ज्ञानेश्वर हॉस्पिटल, तांबेकर हॉस्पिटल, न्युरो हॉस्पिटल अशा अनेक रुग्णालयात रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले देण्याचा प्रकार घडत होता. रुग्णांनी माझाशी संपर्क साधल्यावर मी स्वतः रुग्णालयाकडे पाठपुरावा करून कोरोना रुग्णांचे ४० ते ५० लाखांचे बिले माफ करून दिले आहेत. तसेच बील न दिल्यामुळे रुग्णालय नातेवाईकांची अडवणूक करीत, तसेच बील न दिल्यामुळे रुग्णालय नातेवाईकांची अडवणूक करीत, व मृतदेह देण्यास टाळाटाळ करीत. अशांनाही मनसेचा हिसका दाखवत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. घरातील सर्वच कोरोना सक्रीय असतानाही मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. शिवाय प्रभागमध्ये लसीकरण केंद्रासाठी मागणी, सॅनिटायझिंग फवारणी, पंतप्रधान आवास योजनेमध्ये नागरिकांनी भरलेले पाच हजार रुपये त्यांना परत मिळावेत यासाठी प्रयत्न केले. त्यास यशही मिळाले आहे. प्रभागात रक्तदान शिबीर भरवून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले आहे.

पिंपरी विधानसभा विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे यांनीही रूपीनगर, तळवडे परिसरातील रिक्षा चालकांच्या कुंटूबाची काळजी घेत त्यांना सर्वोतोपरी मदत केली आहे.

उपशहराध्यक्ष विशाल मानकरी म्हणाले, रूपीनगर परिसरात जवळ जवळ २०० रुग्णांना आइसोलेशन बेड, ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटर बेड मिळवुन दिले. १०० रुग्णांना गृह अलगिकरण करुन तज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत उपचार करुण बरे केले. ५० रुग्णांना कोविड प्लाझ्मा मिळवुन दिला. १० रुग्णांना अंत्यविधी करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच सर्व कागदपत्रे काढून देण्यास मदत केली. १५ रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यास कार्डियाक रुग्णवाहिका व तज्ञ डॉक्टर यांची सोय करुन दिली. यमुनानगर परिसरातील रुग्ण कोरोनाने दगावला त्याचा अंत्यविधि करण्यासाठी पालिकेची माणसे आली नाहीत म्हणून स्वतः अंत्यविधि केला. ऑक्सीजन सिलेंडर पुरवले. बिले कमी करुन दिले. कोरोना रुग्णांना मोफत जेवनाची सोयही केली.

उपशहराध्यक्ष राजू सावळे म्हणाले, कोरोनाने मृत रिक्षा चालकाला”मदतीचा हात” देत किराणा तसेच काही रोख रक्कम देऊन त्या कुटुंबाला आधार दिला.
सांगवीच्या गॅस शवदाहिनीत आणि स्मशानभुमीत देवदूतांप्रमाणे काम करणारे ॲापरेटर, कामगार, वॅाचमन याना सुरक्षेसाठी हॅंडवॅाश, सॅनिटायझर, फ्लोरिंग सॅनिटायझर, फेस मास्क, हॅंडवॅाश पंप, सर्जिकल हॅडग्लोज, पीपीई किट व अन्य सूरक्षा कवच, होमेयोपॅथिक गोळ्या दिल्या. तसेच पोलीस बांधवाना पाणी बाॅटल्सचे वाटप केले. शिवाय फायनान्स कंपनीकडून पिळवणूक झालेल्या वंचितांची ओढून नेलेली गाडी परत मिळवून दिली. याशिवाय अनेक उपक्रमही प्रभागात सुरु आहेत.

शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे हे स्वतः आजारी असतानादेखील त्यांनी गोरगरिबांना विविध मार्गाने मदत केली. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. डांगे चौकात एका रुग्णालयात ऐनवेळी ऑक्सिजन सिलेंडर संपला. धावाधाव करूनही मिळेना. रुग्ण अत्यवस्थ पातळीला पोहोचले होते. हेमंत डांगे यांनी शोधाशोध करून त्या रुग्णालयाला सचिन चिखले यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर मिळवून दिला. तसेच रुग्णांना रुग्णालयाची बिलं कमी करून देण्यासाठीही प्रयत्न करीत आहे. शिवाय प्रभागात त्यांचे अन्नदानाचे उपक्रमही सुरु आहेत.

शहर सचिव अनिकेत प्रभू यांची प्लाझ्मादान चळवळही सुरु आहे. आजपर्यंत अनेक कोविड रुग्णांना त्यांनी प्लाझ्मा मिळवून दिला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.

भोसरी विभाग अध्यक्ष अंकुश तापकीर यांचे प्रभागात जोमात काम सुरु आहे. गृह विलगीकरण असो की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात भर्ती करणे, कोविड तपासणी शिबीरं भरविणे आदी उपक्रम सुरु आहेत.

उपशहराध्यक्ष बाळा दानवले म्हणाले, पक्षाच्या माध्यमातून रुग्णालयात ५० ते ६० रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड मिळवून दिले. शिवाय त्यांची लाखांची बीलही कमी करून दिली आहेत. करोनामुळे मृत्यु झालेल्या नागरिकांचे नातेवाईक कोणीही पुढे आले नाही, त्यावर अंत्यसंस्कार केले. रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित केलं. अनेक नागरिकांना रेमडीसीवर मिळून दिले. गृह विलीनीकरणातील रुग्णांना मदत मिळवून दिली. प्रभागात कोविड लसीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ओंकार पाटोळे, दिपेन नाईक, रुषिकेस कांबळे यांचीही मदत मिळत आहे.

महिला शहराध्यक्षा अश्विनीताई बांगर, महिला सेनेच्या शहर सचिव सीमाताई बेलापुरकर, उप शहराध्यक्षा अनिताताई पांचाळ याही कोरोना काळात रणरागिणीसारख्या पायाला भिंगरी लावून काम करत आहेत. महिला कोरोना योद्धयांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकवण्याचे कामही त्या करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button