शिव महापुराण कथा वाचन सोहळा: सभामंडप हाउसफुल्ल…भाविकांनी मांडली बाहेरच बैठक..!
दुसऱ्या दिवशी कथा श्रवणासाठी २ लाखांपेक्षा अधिक भाविक

रविवारी भाविकांच्या गर्दीचा आणखी उच्चांक होण्याची शक्यता
पिंपरी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन वतीने पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे करण्यात आले आहे. या कथेला भाविकांकडून मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीने आज उच्चांक मोडला असून तब्बल २ लाख भाविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हे श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे मुख्य निमंत्रक आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शनिवार व रविवार हे दोन सुट्टीचे दिवस असल्याने या दोन दिवशी अजून भाविक या कथा कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
आयोजकांच्या वतीने पीडब्ल्यूडी मैदानात सुमारे अडीच लाख स्क्वेयर फुटांचा सभामंडप बांधला आहे. यामध्ये मध्यभागी मुख्य सभामंडप असून येथूनच पं. प्रदीपजी मिश्रा कथा सांगत आहेत. मुख्य सभामंडपाच्या दोन्ही बाजूला सभामंडपाएवढेच शामियाने देखील उभारण्यात आले आहेत. आज दुसऱ्या दिवशी तीनही सभामंडप गच्च भरले होते, तरी देखील भाविकांचा ओघ तसाच सुरु राहिला. यामुळे अनेक भाविकांनी कथा ऐकण्यासाठी सभामंडपाच्या बाहेरच बैठक मारली.
हेही वाचा – सोसायटीधारकांच्या मागण्यांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका सकारात्मक
भाविकांचा ओघ सातत्याने वाढत असल्याने कथा सर्व भाविकांना ऐकता व पाहता यावी यासाठी निमंत्रक शंकर जगताप यांच्या वतीने सर्व सभामंडपात व शामियाना परिसरात एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत. या पैकी अनेक स्क्रीन या सभामंडपाच्या व शामियान्याच्या शेवटच्या टोकाला उभारण्यात आल्या असल्याने, शामियान्याच्या बाहेर बसलेल्या भाविकांना देखील कथेचा आस्वाद भक्तीभावाने घेता आला.
सुरक्षा व्यवस्था कमालीची दक्ष
सातत्याने वाढता भाविकांचा ओघ पाहून सुरक्षा व्यवस्था देखील कमालीच्या दक्ष झाली आहे. दुसऱ्याच दिवशी भाविकांची संख्या दोन लाखांच्यावर पोचल्याने पोलीस प्रशासन, खाजगी सुरक्षा व्यवस्था सतर्क आहेत. एवढी भाविकांची गर्दी होवून देखील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी प्रत्येक सुरक्षा रक्षक, पोलीस खबरदारी घेत आहेत. चोख नियोजन, उत्तम व्यवस्था, यामुळे उपस्थित भाविक ज्ञानप्राप्ती केल्याचे समाधान घेवून परताताना दिसत होते.