breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 चेन्नईची जर्सी बदलली, धोनीने केले अनावरण

नवी दिल्ली – तीनदा आयपीएलचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये चेन्नईचे खेळाडू नवीन जर्सीत दिसतील. चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वर तीन स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचे हे तीन स्टार दर्शवतात. चेन्नई सुपर किंग्सने जर्सी अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे.

वाचा :-श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वन डे मालिकेतून बाहेर

तसेच ‘सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होतो. हा कॅमोफ्लॉज त्यांच्यासाठीच आहे. तेच आपले खरे नायक आहेत’, असे सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी कोरोना विषाणूमुळे युएईमध्ये आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यंदा पुन्हा एकदा आयपीएलचे भारतात पुनरागमन होणार आहे. 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे. तर 30 मे रोजी फायनल खेळवली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button