breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच लढणार; महायुतीचा उमेदवार कोण?

Shirur Lok Sabha News : मुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरा झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच शिरूर लोकसभेची जागा लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यासोबत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बैठक पार पडली. बैठकीला शिवसेनेकडून इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते. सध्या शिरुर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे इच्छुक आहेत. शिरुर लोकसभेसाठी अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाही.

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू आहे. आढळराव पाटलांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा  – लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा

शिरुर लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जुन्नर तालुक्यातील नेतेमंडळींची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडल्याची माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदार संघातील नेतेमंडळी देखील उपस्थित होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील आणि इतर नेत्यांना बाहेर ठेवून बंद दाराआड दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरुन आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडले. घडलेल्या प्रकारामुळे ते नाराज असल्याचंही सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button