breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मावळात शिंदे गटाचे ‘श्रीरंग’; शिरुरला आढळरावांच्या ‘हाती कमळ’?

भाजपाचा संभाव्य फॉर्म्यूला : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू

पुणे । महान्यूज। विशेष प्रतिनिधी
देशाच्या राजकीय पटलावर २०२४ ची लोकसभा निवडणूक अत्यंत निर्णायक होणार असून, भाजपाविरोधी सर्व विरोधक एकवटणार आहेत. त्यामुळे केंद्रीय पातळीवर भाजपाकडून सतर्कता बाळगत देशातील १४४ लोकसभा मतदार संघात प्रवास योजनेची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत भाजपाची ताकद तुलनेत कमी असलेल्या मतदार संघांवर ‘फोकस’ करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ पैकी १६ लोकसभा मतदार संघ भाजपाने ‘टार्गेट’ केले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.


मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार (शिंदे गट) श्रीरंग बारणे यांच्या मतदार संघाचा भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेत समावेश नाही. त्यामुळे बारणे यांना शिंदे गटातून नियोजित भाजपा- शिवसेना (शिंदे गट) महायुतीची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार विरुद्ध बारणे असा सामना पुन्हा पहायला मिळेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपाने लक्ष केंद्रीत केले असून, निवडणूक प्रभारी म्हणून भाजपाच्या कट्टर निष्ठावंत व पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. संयोजकपदी ॲड. धर्मेंद्र खंडारे कार्यरत आहेत. मतदार संघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना आव्हान देण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. आता भाजपाने दीड वर्षे अगोदरच मतदार संघातील निवडणुकीची तयारी सुरू केल्यामुळे उमेदवारीसाठी भाजपाचा ‘क्लेम’ राहणार हे निश्चित मानले जाते. त्यामुळे भाजपाच्या कमळाच्या तिकीटावर शिवाजीराव आढळराव यांना संधी देण्यात येईल. त्याद्वारे ‘उमेदवार तुमचा आणि चिन्ह आमचे’ या सूत्राने भाजपा व शिंदे गटात समझोता होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद…
लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षांचा अवधी असला तरी, भाजपाकडून लोकसभा प्रवास योजना सुरू करुन रणशिंग फुंकल्याचे मानले जाते. दुसरीकडे, राष्ट्रीय काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ आंदोलन सुरू करुन भाजपाला आव्हान दिले जात आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन घेत निवडणुकीचा शंखनाद केल्याचे मानले जात आहे.

कोटपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा उमेदवार निवडणून येणार आहे. संघटनात्मक बांधणीमुळेच भाजपाने यशस्वी वाटचाल ठेवली आहे. आगामी दीड वर्षांत शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
– माधुरी मिसाळ, निवडणूक प्रभारी, शिरुर लोकसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button