breaking-newsमनोरंजन

रणवीर सिंगच्या त्या ट्विटला नागपूर पोलिसांनी दिले ‘खतरनाक’ उत्तर

रणवीर सिंग हे नाव ऐकताच अतरंगी कपडे आणि उत्साहाने भरलेला रणवीरचा चेहरा डोळ्यासमोर येतो. सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असणारा रणवीर हा अनेकदा पत्नी दिपिकाच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतो. स्वत: रणवीरही आपल्या सोशल नेटवर्किंगवरुन वेगवेगळ्या आणि तितक्याच भन्नाट कपड्यांमधील फोटो पोस्ट करत असतो. नुसताच त्याने स्वत:चा असाच एका फोटो ट्विट केला. मात्र या फोटोला चक्क नागपूर पोलिसांनी उत्तर दिले आहे. नागपूर पोलिसांचे हे ट्विट सध्या व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.

झालं असं की रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लॅण्डलाइन फोनवर बोलतानाच्या पोजमधील स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये रणवीर रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. सहा नोव्हेंबर रोजी दुपारी ट्विट केलेला हा फोटो एका कपड्यांच्या जाहिरातीसंदर्भातील आहे. या फोटोत रणवीरने पांढरा शर्ट, पिवळ्या रंगाची बेट बॉटम पॅण्ट आणि गळ्यात स्कार्फ असा भन्नाट पोषाख परिधान केला आहे. तो लाल रंगाचा लॅण्डलाइन फोन हातात घेऊन उभा आहे. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या हसीना मान जाऐगी चित्रपटामध्ये गोविंदा आणि करिष्मा यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या लोकप्रिय गाण्यातील ओळी रणवीरने या फोटोला कॅप्शन म्हणून वापरल्या होत्या. रणवीरने ‘वॉट इज मोबाईल नंबर? वॉट इज यूआर स्माइल नंबर?, वॉट इज यूआर स्टाइल नंबर? करु क्या डायल नंबर?’ या गाण्याच्या ओळी कॅप्शन म्हणून पोस्ट केल्या.

रणवीरच्या या ट्विटला १८ तासांमध्ये अकराशेहून अधिक रिट्विट मिळाले. मात्र त्याच्या या पोस्टवर नागपूर पोलिसांनी दिलेल्या उत्तराला १५ तासामध्ये चार हजारच्या आसपास रिट्विट मिळाले आहेत. नागपूर पोलिसांनी रणवीरचे हे ट्विट रिट्विट करुन कोट करत ‘१००’ असे उत्तर दिले आहे. म्हणजेच आमचा फोन नंबर १०० असल्याचे नागपूर पोलिसांनी अगदी मजेशीर पद्धतीने म्हटले आहे.

नेटकरी नागपूर पोलिसांच्या या उत्तराच्या प्रेमात पडले असून त्यांनी हे ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याआधीही भारताच्या चांद्रयान २ मोहिमेमधील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर नागपूर पोलिसांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. विक्रम लँडरला उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये ‘प्रिय विक्रम, कृपा करुन उत्तर दे. सिग्नल तोडल्याबद्दल आम्ही तुला दंड करणार नाही,’ असं नागपूर पोलिसांनी म्हटलं होतं. हे ट्विटही चांगलचं व्हायरल झालं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button