breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बाळासाहेबांना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा विश्वप्रवक्ते कुठे होते? शिंदे गटाचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानात प्रचारासाठी गेले आहेत. तेथे एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवर हिंदूह्रदय सम्राट असा उल्लेक करण्यात आला आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. गद्दारांना हिंदूह्रदय सम्राट म्हणायची नवी पद्धत नव्या हिंदुत्वात आलेली असल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, यावरून शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शीतल म्हात्रे म्हणाल्या, हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा ‘जनाब’ म्हटलं गेलं तसंच हिंदूहृदय सम्राट ही उपाधी बाळासाहेबांच्या नावापुढे लावण्यासाठी ज्यांना लाज वाटत होती तेव्हा तुम्ही (उद्धव ठाकरे) सत्तेत होतात. मला आमच्या महाज्ञानी विश्वप्रवक्त्यांना विचारायचं आहे जेव्हा बाळासाहेबांना जनाब म्हटलं गेलं तेव्हा तुम्ही गप्प बसला होतात. राजस्थानमध्ये शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी, एकनाथ शिंदेंवर प्रेम करणाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केला तर तुमच्या पोटात का इतकं ढवळलं गेलं आहे?

हेही वाचा  –  पुणे स्टेशनवर प्रवाशांना २४ तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी स्वतःला पक्षप्रमुख असंही म्हटलं नाही. त्यांनी स्वतःला मुख्य नेते असं म्हटलं आहे. आम्हाला या पदाची कधी गरज नव्हती. कारण आम्हाला माहीत आहे की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहे. त्यामुळे उगीचच दोरीला साप म्हणून धोपटू नका. आपण हिंदूहृदय सम्राट सत्तेत असताना का नाकारली याचं उत्तर जनतेला द्यावं, असंही शीतल म्हात्रे म्हणाल्या.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट असतील तर त्यांनी असं काय महान कार्य केलं आहे ते पहावं लागेल आम्हाला. आम्ही इतके वर्षे सन्मानीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसह काम केलं. त्यांचा संघर्षही पाहिला. त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोडी केली नाही. आता गद्दारांना आणि बेईमान्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल. भाजपानेच केलं आहे, राजस्थानच्या भाजपाला महाराष्ट्रात काय सुरु आहे काय माहीत आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन गेले असतील प्रचाराला, असं संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button