राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत कोअर कमिटीचा मोठा निर्णय!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात या समितीची बैठक झाली. यात शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला. यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आम्ही शरद पवारांनी भेट घेऊ आणि समितीने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांना कळवू. त्यांनी किती काळ अध्यक्ष रहावं याबाबत आम्ही काहीही कालमर्यादा दिलेली नाही. आम्ही काही दिवसांपूर्वीच एकमताने त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केली होती, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.