breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘आमचा पाठिंबा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपाला नाही’; शरद पवार

मुंबई : नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीपी आणि भाजप युतीला बहुमत मिळाले. याच नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे, भाजपला नव्हे, असे स्पष्टीकरण दिलं आहे. नागालँडमध्ये भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाहीत तरी त्यांना सरकार बनवायला अडचण येणार नाही.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँड सरकारचा भाग व्हावे की नाही याबाबत आज निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी ईशान्य प्रभारींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी नागालँड राज्याच्या व्यापक हितासाठी नागालँडचे मुख्यमंत्री एन. रिओ यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळाची प्रस्तावित यादीही मंजूर केली, अशी माहिती नरेंद्र वर्मा यांनी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button