breaking-newsमनोरंजन

सोशल मीडियावर आमीर खानला केले ट्रोल

फोटोग्राफर्सपासून दूर राहण्याचा शक्‍यतो प्रयत्न बॉलिवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खान करत असतो. त्याचबरोबर त्याचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे, पण तो त्यावर फारसा अक्‍टिव्ह नसतो. पण नुकताच फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका फोटोवरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. मुलगी ईरा खानसोबतचा एका मजामस्तीचा आमीरने फोटो शेअर केला होता. एका गार्डनमध्ये दोघे खेळताना दिसत आहेत. पण आमीरचा हा फोटो काहींना आवडला नाही आणि या फोटोवर त्यांनी वाईट आणि अश्‍लील कमेंट्‌स करायला सुरुवात केली.

आमीर खानला रमजानच्या महिन्यात अशाप्रकारचा फोटो शेअर करायला नको होता, असे काहींनी म्हटले आहे. काही नेटीझन्स मुलगी-वडिलांच्या नात्यावर अश्‍लील शेरेबाजी करून टीका करत आहेत. अल्लाहला घाबर, मी तुझा आदर करतो. अभिनयाप्रती तुझे समर्पण आणि मेहनतीला तोड नाही. पण हे स्वीकारण्यासारखे नसल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. एक जण म्हणाला की, आमीर सर थोडी तरी शरम बाळगा. ती तुमची मुलगी आहे. तिला रमजानच्या महिन्यात योग्य कपडे घालायला हवे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button