TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सिद्धेश्वर जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त जेष्ठ महिला भगिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरीः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मोरेवस्तीमधील सिद्धेश्वर जेष्ठ नागरिक संघाने सर्व जेष्ठ महिला भगिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संघातील अनेक जेष्ठ माता-भगिनी यांच्यासमवेत नारी शक्ती महिला मंचच्या अध्यक्षा नीलिमा मनोज जरे या उपस्थित होत्या. यावेळी ज्येष्ठ महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी निलिमा जरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला कार्यरत आहेत. घर चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत सर्व ठिकाणी आपल्या महिला कार्यरत आहेत.आज आपल्या देशाची राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे. त्यामुळे आज महिला पुरुषांपेक्षा कुठेच मागे नाहीत, असे नीलिमा जरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
सिद्धेश्वर जेष्ठ नागरिक संघाने नीलिमा जरे यांना आमंत्रित करत त्यांचा सन्मान केला. सदर कार्यक्रमास नीलिमा जरे या उपस्थित राहिल्याबद्दल संघाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button