breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आम्ही तिघांनी ठरवलं तर..’; शरद पवार याचं सूचक विधान

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तीन नेते पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, धुळे या सारख्या संस्थांना आपल्याकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत आपल्याला सरकारशी बोलणं अडचणीचं जात आहे. सध्याच्या स्थितीतून आज किंवा उद्या sharad pawar uddhav thackeray and balasaheb thoratकाही तरी मार्ग निघतील आणि जेव्हा हे घडलं त्यावेळी सरकारला मदत करायला भाग पाडणं अडचणीचं ठरणार नाही, मी, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, आम्ही ठरवलं तर महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही.

हेही वाचा – संभाजी भिडे पुन्हा बरळले, महात्मा फुले आणि साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान

ज्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात देखील आम्ही त्यांच्या सरकारकडून दोन कामं करून घेतली होती. संस्थांना मदत करण्याची गरज त्या सरकारच्या काळात पूर्ण केली होती तशीच मदत आज होण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांना दुर्ग भ्रमंती बाबत अतिशय माहिती आहे. ऐतिहासिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप आस्था आहे, ते उत्तम फोटोग्राफर आहेत, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button