ताज्या घडामोडीपुणे

व्यावसायिक डिएसके यांचा जामीन अर्ज फेटाळला, पत्नीचा जामीन मंजूर

पुणे | ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डिएसके) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तर, पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2018 पासून कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे. आजच्या निर्णयानंतर हेमंती यांची तुरुंगातून जामीनावर सुटका होणार आहे.

उच्च न्यायालयात वकील अशुतोष श्रीवास्तवा, रितेष येवलेकर यांनी कुलकर्णी यांची बाजू मांडली. शुक्रवारी या प्रकरणामध्ये न्या. डीपी नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता हेमंती यांना जामीन मिळाला असला तरी डी. एस. के. यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती श्रीवास्तवा यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button