breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विकेट गेलेला माणूस विकेट गेली कसं सांगतो? शरद पवारांचा फडणवीसांना टोला

पुणे : २०१९ साली भाजपा-राष्ट्रवादी सरकारला शरद पवार यांचा पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरूनच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का? असा टोलाही शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवारांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची हिस्टरी समजून घ्यायला हवी. तरच ही मिस्ट्री कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमची फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.

हेही वाचा – Electricity Rate : महानिर्मितीच्या प्रतियुनिटचा वीज दर ३० पैशांनी वाढणार?

यानंतर आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्ऴ अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही पुर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरूवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी जे केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button