ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवारांनी अर्ज भरला ? कुणाला मोठा फटका बसणार ?

लोकसभा रणसंग्राम: तिसरा उमेदवार म्हणून शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात

पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांच पवार घराणे आमनेसामने आले आहेत. महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांची कन्या तसेच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे रिंगणात उभे राहिले आहेत. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी सरळ लढत होत असताना आता बारामतीत तिसरा उमेदवार म्हणून शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार बारमतीतून तर रायगडमधून सुनील तटकरे हे १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अशातच भारतीय गीग कामगार मंचच्या वतीने शरद पवार हे गुरूवारी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ते शरद पवार मंचचे सक्रिय सदस्य असून बारामतीतीलच रिक्षाचालक आहेत. अन्य ३ मतदारसंघातूनही गीगचे सदस्य गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांपैकी १२ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरूवात झालीय.

शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच भारतीय गीग कामगार मंचच्या वतीने शरद पवार नावाचे व्यक्ती निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. याचा फटका साहजिकतच सुप्रिया सुळे यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नामसाधर्म्यमुळे आता बारामतीत काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांच्या विरोधात विरोधकांनी मोठी रणनिती आखली आहे. रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन अनंत गीते उतरले आहेत. याचा मोठा फटका त्यांना बसू शकतो. त्याआधी २०१४ साली सुनील तटकरे यांना मोठी किमंत चुकवावी लागली होती. सुनील तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला ९ हजार ८४९ मत पडल्याने गीतेंकडून त्यांचा २ हजार मतांनी पराभव झाला होता.

दरम्यान, त्याआधी २००४ साली लोकसभा निवडणुकीत ए. आर अंतुले नावाचे दोन उमेदवार होते. त्यावेळी बॅरीस्टर ए. आर अंतुले यांचा विजय झाला होता. तर अपक्ष लडणाऱ्या डमी ए. आर.अंतुलेंना २३ हजार ७७१ मत पडली होती. त्याआधी १९९६ मध्ये दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार होते. तर १९९१ मध्ये दोन दत्ता पाटील यांनी निवडणुक लढविली होती. २०१९ साली देखील सुनील तटकरे नावाचे तीन उमेदवार निवडणुक रिंगात होते. त्यामुळे उरर्वित दोन उमेदवारांना एकूण १५ हजार मतं मिळाली होती.

यातच आता बारामतीत शरद पवार नावाचे व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच राष्ट्रवादीत झालेली पक्ष फुट अन् त्यातून निर्माण झालेली सहानुभूती ही शरद पवारांच्या पाठीमागे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीत डमी उभा असलेला उमेदवार किती मतं घेऊन जाणार ? त्याचा कुणाला फटका बसणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button