ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप आमदारांकडून ‘स्थायी’च्या भ्रष्टाचाराचे समर्थन लाजीरवाणे; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

पिंपरी चिंचवड | भाजपने ना भय ना भ्रष्टाचाराच्या वग्लना करत महापालिकेची सत्ता मिळविली. पण, सत्ता मिळताच घोषणेला तिलांजली देत प्रचंड भ्रष्टाचार आणि भय सुरु केले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाचप्रकरणी ‘एसीबी’ने धाड टाकत स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना पालिकेतून अटक केली. यामध्ये काय तरी गूढ आहे. त्यामुळेच न्यायालयानेही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. असे असताना भाजप आमदारांनी स्थायी समितीच्या भ्रष्टाराचे समर्थन करणे लाजीरवाणे असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडले.वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना एसीबीने बुधवारी रंगेहाथ पकडले. अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी. आता या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अतिशय खालच्या थराला जाऊन पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटी करप्शन विभागाने कारवाई कोणत्या आधारावर केली असा सवाल भाजपने केला.

त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपवर पलटवार केला. खराळवाडीतील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, विशाल वाकडकर उपस्थित होते. कालच्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिलेल्या सर्व विषयांना स्थगिती देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीने बेस्ट सिटी म्हणून शहराची ओळख देशात निर्माण केली. तर, भाजपने पाच वर्षात भ्रष्टाचारी शहर अशी ओळख केल्याचा आरोपही त्यांनी केला.

”राष्ट्रवादीने 15 वर्षांत विकासकामे करुन शहराचा चेहरामोहरा बदला. जगाच्या नकाशावर शहराची वेगळ ओळख निर्माण केली” असे सांगत वाघेरे म्हणाले, ”भाजपच्या साडेचार वर्षांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. कालची घटना अतिशय निंदणीय आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील. त्यांच्यावर कारवाई व्हावी. आमच्या पक्षाचा कोणी दोषी असेल. तर, त्याच्यावरही कारवाई व्हावी. चौकशीनंतर सर्व गूढ बाहेर येईल”.

”काहीतरी गूढ असल्यामुळेच न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असेल. दोनही आमदार स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करतात हे लाजीरवाणे आहे. आमदारांना आता सांगायला काही राहिले नाही नसल्याचे” विरोधी पक्षनेते मिसाळ म्हणाले. ”भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. आमच्यावर खोटेनाटे आरोप केले. ते आरोपच राहिले. भाजपच्या राजवटीत पोलिसांनी महापालिकेत येऊन कारवाई केली. लाच घेताना पकडल्याचे” शितोळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button