Uncategorizedक्रिडाताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेराष्ट्रिय

ब्रिक्स, डीवाय पाटील, आयोजन संघाची आगेकूच कायम

  • आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा : मराठवाडा मित्रमंडळ, एसबी पाटील संघ पराभूत

पुणे : ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्ट, डीवाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर लोहगाव व आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच कायम राखली.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्ट संघाने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाला ३६ धावांनी पराभूत केले. ब्रिक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ६ षटकांत ३ बाद ६२ धावा केल्या. ब्रिक्स संघाकडून कैवल्य बोर्डेने १८ चेंडूत ३ चौकार व एका षटकार लगावताना २७ धावांची खेळी केली. रोहित जे. याने दोन गडी बाद केले. मराठवाडा मित्रमंडळ संघाला हे आव्हान पेलवले नाही. मराठवाडा संघाला निर्धारित ६ षटकांत ५ बाद २६ धावाच करता आल्या. ब्रिक्स संघाकडून कैवल्य बर्डेने २ गडी बाद केले.

डीवाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर लोहगाव संघाने एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाला २२ धावांनी पराभूत करताना स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. डीवाय पाटील संघाने निर्धारित ६ षटकांत ४ बाद ७२ धावा केल्या. मौलिक भारद्वाजने १९ चेंडूत ४९ धावांची खेळी ५ चौकार व ४ षटकार मारून सजविली. त्याला अभिषेक चौधरीने १३ धावा करताना सुरेख साथ दिली. यश बच्चेने २ तर आयुष खांडगेने १ गडी बाद केला. एसबी पाटील संघाने निर्धारित ६ षटकांत ६ बाद ५० धावाच करता आल्या. पाटील संघाकडून यश पाटीलने १८, प्रणव गायकवाडने १२ तर राहुल रेड्डीने ११ धावा करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. शामल पलोडने ३, रंजन कुमारने २ तर चैतन्य गाडेने प्रत्येकी १ गडी बाद केला.

आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन संघाने अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाला ९ गडी राखून पराभूत केले. अल्लाना संघाने निर्धारित ६ षटकांत ६ बाद ३७ धावा केल्या. मुशर्रफ पटेलने सर्वाधिक ८ धावा केल्या. आयोजन संघाकडून प्रसाद जे.ने ३, संदेश शहाने २ तर स्वयम पुंडेने १ गडी बाद केला. आयोजन संघाने २.५ षटकांत १ बाद ४० धावा करताना विजय साकारला. प्रज्वल जाधवने धडाकेबाज फलंदाजी करताना १६ धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button