ताज्या घडामोडीपुणे

औंधच्या गायकवाड बापलेकांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पुणे | खंडणी, फसवणूक आणि ठार मारण्याच्या प्रयत्नात मागील अनेक दिवसांपासून फरार असणाऱ्या गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड या दोघांना अखेर पुणे पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय 70), नंदा नानासाहेब गायकवाड(वय 65) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आरोपींवर बेकायदा जमीन बळकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे, आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून सुनेचा छळ करणे तसेच खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात दोघांसह कुटुंबातील इतर आरोपींचा ही समावेश आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून प्रथम मोक्काची कारवाई केली. तर काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. दोन कारवाया झाल्यानंतर बापलेक पसार झाले होते. त्यांना सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई यांच्या पथकाने बुधवारी कर्नाटक राज्यातून अटक केली. तसेच आज न्यायालयात हजर केले.

यावेळी सरकारी वकिल राजेश कावेडीया यांनी या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी धमकावून काही जमिनींचा ताबा घेतला आहे, असे ॲड. कावेडिया यांनी न्यायालयास सांगितले. तर गायकवाड यांच्यावर राजकीय वैमनस्यातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सुनेचे सासरच्यांबरोबर पटत नव्हते. त्यामुळे तिच्या परिवाराने हे गुन्हे दाखल करण्यासाठी यंत्रणेवर दबाव टाकला आहे, असा युक्तिवाद गायकवाड यांच्यावतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button