ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पोर्तुगालमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती; सरकार चक्क रेशनवर देणार पाणी

लिस्बन |  सध्या पोर्तुगालमधील अनेक भागातील जनता तीव्र दुष्काळाच्या संकटात सापडली आहे. या देशातील ९५ टक्के शहरे दुष्काळी परिस्थितीमुळे बेजार झाली आहेत. भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने आता सरकारने चक्क जनतेला रेशनवर पाणीवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोर्तुगीज पाणी वितरण आणि ड्रेनेज असोसिएशनचे अध्यक्ष रुई गोडिन्हो यांनी पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी मुलभूत संरचनात्मक उपायांच्या त्वरित अंमलबजावणीचा आदेश दिला आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा म्हणून विशिष्ट उपाययोजना करून राष्ट्रीय कार्यक्रम राबवले पाहिजेत. आपल्या सरकारच्या पर्यावरण निधीतून ५ दशलक्ष युरो जागरुकता मोहिमा राबविल्या जाणार आहेत. सांडपाण्याचा कमी वापर आणि पाण्याचा तर्कशुद्ध वापर याचा त्यात समावेश आहे. विशेष करून दक्षिण भागात पाण्याचे संकट गंभीर आहे. अल्गार्वे इंटरम्युनिसिपल कम्युनिटीने आपल्या भागातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी संयुक्त उपाययोजना राबविण्याची घोषणा केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button