पिंपरी / चिंचवड

महिलेवर अश्लील टिपण्णी करत पतीला दगडाने मारहाण : तिघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सायंकाळच्या वेळी वॉकिंग करून पती पत्नी घरी जात असताना रस्त्याच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करत असलेल्या व्यक्तीने महिलेकडे पाहून वाईट हावभाव केले. दुस-या व्यक्तीने अश्लील टिपण्णी केली. याचा जाब महिलेच्या पतीने विचारला असता तिघांनी मिळून पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 7) सायंकाळी सात वाजता शिंदे वस्ती मारुंजी येथे घडली.

गणेश मोहन बुचडे (रा. शिंदे वस्ती, मारुंजी), संतोष पंडित गुंजाळ (रा. काळा खडक वाकड), संदीप गजानन भुरकाडे (रा. शिंदे वस्ती, मारुंजी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजता फिर्यादी आणि त्यांचे पती वॉकिंग करून घरी जात होते. त्यावेळी आरोपी गणेश हा फिर्यादी यांच्यासमोर उघड्यावर लघुशंका करत होता. त्याने फिर्यादीकडे पाहून वाईट हावभाव केले. त्यांनतर आरोपी संतोष याने फिर्यादी यांना ऐकू जाईल अशा आवाजात अश्लील शब्द उच्चारले. फिर्यादी यांचे पती याबाबत विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button