breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, इन्स्पेक्टरने पोलीस महासंचालकांकडे केली तक्रार

मुंबई |

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात एका पोलीस इन्स्पेक्टरने पोलीस महासंचालकांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली. अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे इन्स्पेक्टर बी. आर.घाटगे यांनी पत्राच्या स्वरुपात एक तक्रार २० एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांना दिली असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही जोडून हे पत्र दिलं आहे. सिंग यांच्या विरोधातली भ्रष्टाचाराची ही दुसरी तक्रार आहे. गेल्या महिन्यात त्यांची मुंबई पोलीस आयुक्त या पदावरुन बदली करण्यात आली होती. पहिली तक्रार मुंबईचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी दाखल केली होती.

पोलीस महासंचालकांना दिलेल्या या १४ पानी तक्रारीमध्ये घाडगे यांनी सांगितलं आहे की सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांमध्ये सामील होते. या पत्रात घाडगे यांनी सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जमीन घोटाळे, सरकारी निवासस्थानाचा तसंच सुविधांचा गैरवापर आणि इतर प्रकारच्या भ्रष्टाचारांमध्ये ते सामील असल्याचा आरोप सिंग यांच्यावर केला आहे. सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना घाडगे बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असल्याचंही घाडगे यांनी सांगितलं आहे.पीटीआयशी बोलताना घाडगे म्हणाले, “माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत आणि जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा हे पुरावे मी सादर करेन”. यावर सिंग यांनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.

वाचा- #Covid-19: US, UK, रशिया, ऑस्ट्रेलिया, सौदी, चीनसहीत एकूण १० देश भारताला मदत करण्यास तयार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button