breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

फडणवीस प्रगल्भ मात्र; शिंदे गटातील 40 आमदारांची बुद्धी नॅनो : संजय राऊत

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशाप्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नाही, असं वक्तव्य शिवसेनेतून फूटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी केलं असतं तर त्यांची बुद्धी ही नॅनो आहे आम्हाला माहित आहे. प्रगल्भ राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ काम केलं आहे असे देवेंद्र फडणवीस यांना कालचा मोर्चा दिसला नसेल आणि अनुभवला नसेल, तो मोर्चा नॅनो, अपयशी, फेल आहे अशी भूमिका त्यांनी घेतली. यामागे अलीकडे ते दिल्लीला गेले होते, तिथे दिल्लीश्वराने त्यांना गुंगीचं इंजेक्शन दिलेलं दिसतय, ती गुंगी अजून उतरलेली दिसत नाही. फडणवीसांनी कालच्या मोर्चाचे स्वागत करायला हव होतं आणि मोर्चाला समोरं जायला हवं होतं, म्हणत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत आज सकाळी पत्रकार परिषदत बोलत होते.

फडणवीसांची भाषा ही महाराष्ट्रातील चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही
राऊत म्हणाले, कालचा मोर्चा सरकारविरोधात होता असं मानत नाही, कालचा मोर्चा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात होता. कालचा विराट मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या शक्ती या महाराष्ट्रात आहेत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या शक्ती या महाराष्ट्रात निर्माण झाल्या आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. या सगळ्याच्याविरोधात काल महाराष्ट्रप्रेमी जनता एकवटली होती. यावर फडणवीस ज्या पद्धतीने त्यांना भाषा वापरत आहेत, हे महाराष्ट्र राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही, म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो
हे नॅनो सरकार आहे. नॅनो गोष्टी फार टिकत नाही. नॅनो कारचा कारखाना बंद झाला आहे. अशा फॅक्टऱ्या अधिक टिकत नाहीत. नॅनो हा शब्द फडणवीसांनी दिला म्हणून वारंवार वापरतो. त्यांनी हा शब्द वापरून चूक केली. मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो आहे. हे सरकार पडणार हे मी सांगतो तेव्हा त्यात तथ्य असतं. पडद्यामागे काय चाललं हे त्यांना माहीत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

बावनकुळे फक्त फडफडत आहेत
शरद पवार हे मोठे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. इतके वर्ष ते काम करत आहेत. ते कुणाच्या बुद्धीने चालत नाहीत. मी पवारांचं नेतृत्व मानतो. ठाकरे हे सेनापती आहेत. सेनापती आदेश देतात ते आम्ही मानायचे असतो. बावनकुळे यांनी शरद पवारांवर बोलू नये. मोदीही पवारांना गुरु मानतात हे बावनकुळेंना माहीत नाही. बावनकुळे फक्त फडफडत आहेत, अशी जहरी टीकाही राऊतांनी केली आहे.

महाराष्ट्राविरोधात द्वेष आम्ही 70 वर्षात पाहिला नाही
टीका लोकशाहीच होते, सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधी सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. पण कालचा मोर्चा त्यांना दिसला नाही, त्यांच्या डोळ्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास महाराष्ट्र द्वेषाचं वडसं आलेला आहे, महाराष्ट्राविरोधात इतका द्वेष आम्ही 70 वर्षात पाहिला नाही. महाराष्ट्र प्रेमी जनता एकवटली आणि त्याविरोधात राज्यकर्ते ते उभे ठाकले आहेत, असही राऊत म्हणाले.

फडणवीस स्वत:ची अवहेलना करु नका, आपलं राजकीय भविष्य खूप मोठं आहे
हा मोर्चा नॅनो होता का हे देशाने पाहिले. देवेंद्र फडणवीसांना एवढचं सांगणं आहे की, स्वत:ची अवहेलना फार करून घेऊ नका. आपलं राजकीय भविष्य खूप मोठं होणार आहे, होऊ शकत, आपल्यात ती क्षमता आहे. पण ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली, गेल्या 70 वर्षात ते राजकारणातून पाचोळ्यासारखे उडून गेले, असही ते फडणवीसांना म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला
कालच्या मोर्चाचे तुम्ही कौतुक आणि स्वागतचं करायला पाहिजे होतं. आमच्यावर टीका करा पण नंतर पण लाखो लोक शिवरायांच्या, फुले, आंबेडकरांच्या जयजय काराच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले, तुम्ही एकप्रकारे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, असही राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button