breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘आपला ‘हक्काचा माणूस’ पुन्हा संसदेत पाठवा’; खासदार बारणे

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या पहिल्या फेरीची सांगता बारणे यांनी थेरगाव या स्वतःच्या गावात केली. प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन भेटीगाठी घेण्याबरोबरच ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन खासदार बारणे यांनी मतदारांशी संवाद साधला.

थेरगाव गणेशनगरमध्ये पुष्पवृष्टी करून तसेच फटाके वाजवून खासदार बारणे यांचे स्वागत करण्यात( आले. शिव कॉलनीमध्ये झालेल्या कोपरा सभेस माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्यासह सोपान चौधरी, विलास जगदाळे, लहू नवले, विजय शिंगटे, राजेंद्र शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, देश कोणाच्या हातात द्यायचा, हे ठरवणारी ही महत्त्वाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून झपाट्याने विकास करीत आहे. केंद्राच्या माध्यमातून महापालिकेला ४००० कोटींपेक्षा अधिक निधी मिळालेला आहे. त्यातून वॉर्ड-वॉर्डमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसह विविध विकासकामे झाली आहेत. थेरगावने मला नेहमीच सहकार्य केले आहे. आपल्या हक्काच्या माणसाला यावेळी शंभर टक्के मतदान झाले पाहिजे.

कानिफनाथ गुजर यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या कोपरासभेला भानुदास गुजर, रोहिदास साधू, वसंत गुजर, विठ्ठल गुजर, दीपक गुजर, निखिल गुजर, सुदाम गुजर, नितीन गुजर, प्रकाश गुजर, शाम गुजर, नारायण बारणे, राजेंद्र भोंडवे, नाना पारखी, पोपटराव भेगडे, प्रल्हाद गुजर, अजिंक्य गुजर, अमित गुजर, स्वप्नील गुजर, लालासाहेब गुजर, विक्रम गुजर, सार्थक गुजर, प्रतीक गुजर, गणेश गुजर यांच्यासह परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरीश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा – ‘शरद पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय केला’; चंद्रशेखर बावनकुळे

संतोष मंगल कार्यालयामध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात खासदार बारणे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका मायाताई बारणे, उद्योजक बाळासाहेब बारणे आदी उपस्थित होते. ऋषिकेश काशीद यांनी सूत्रसंचालन केले.

खासदार बारणे यांनी जयदीप माने, तुकाराम गुजर, कांतीलाल गुजर, शालिनीताई गुजर, संभाजी शेलार, गणेश गुजर, विकास गुजर, नवनाथ गुजर, दिगंबर गुजर, भानुदास गुजर, स्वप्नील मातेरे, दिनेश घोगरे, रवी भिलारे, नम्रता भिलारे, सुनीलशेठ पारख, देवेंद्र पारख, डॉ. प्रवीण आव्हाड, मुरलीकांत पेटकर, घनश्याम पवार, भास्कर जावळे, बाळासाहेब पवार, विशाल पवार, मनीषा पवार, प्रमोद पवार, मनोहर पवार आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले.

पिंपळे सौदागर येथे जाऊन खासदार बारणे यांनी भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पाऊस व अंधारातही प्रचार जोरात

संध्याकाळी आलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर खंडित झालेला वीजपुरवठा अशा अनेक अडचणींवर मात करत बारणे यांनी मतदारांशी संपर्क साधला. गोविंद बारणे, अभिषेक बारणे, सुरेश बारणे, सागर भरणे, काशिनाथ बारणे, रमेश बारणे, माऊली बारणे, विजय बारणे, अबूतात्या बारणे, शिवाजी आबा बारणे, करिष्मा सनी बारणे, रामदास बारणे, रमेश बारणे, महेश सुदाम बारणे, विजय बारणे,  मारुती पवार, गोरख पवार, अनिल पवार, दिलीप पवार, विश्वनाथ पवार, महेश नंदू बारणे, यांना कैलास बारणे, प्रवीण बारणे, ॲड. दिनकर ज्ञानेश्वर बारणे, श्याम नाना बारणे, नाना बारणे, सचिन पवार, तानाजी बारणे, नवनाथ जाधव, गौरव जाधव आदींच्या निवासस्थानी भेट देऊन बारणे यांनी सहकार्याची विनंती केले. फटाके वाजवून, औक्षण करीत सर्वांनी बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button