breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! देशात ‘या’ नियमांमध्ये मोठे बदल

1 July Rule Change : जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाली कात्री लागणार आहे. यामध्ये स्वयंपाकघरापासून ते तुमच्या बँक खात्याशी संबंधित बदलांपर्यंत सर्व बाबींचा समावेश आहे. जाणून घ्या नेमकं काय आहेत बदल..

HDFC Bank : गेल्या काही दिवसांपासून एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आहे. अशातच जुलै महिन्याच्या नवीन बदलानुसार एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता एचडीएफसी बँक जगातील सर्वात व्हॅल्यूएबल बँकांच्या यादीत सामील झाली आहे. आता HDFC बँक जगातील चौथी व्हॅल्यूएबल बँक बनणार आहे.

RBI Floating Savings Bond : आजच्या काळात आर्थिक गोष्टींकडे सर्वसामान्य लोक अधिक लक्ष देतात. आर्थिक गुंतवणुक करायची झाल्यास लोक एफडीला अधिक प्राधान्य देतात. अशातच या महिन्याच्या नवीन बदलानुसार इन्वेस्टमेंट इंस्ट्रूमेंट FD पेक्षा RBI Floating Rate Savings Bonds २०२२ ला चांगलं व्याज मिळणार आहे. सध्या RBI Floating Rate Savings Bonds २०२२ ला सध्या ७.३५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. ते १ जुलैपासून म्हणजेच आजपासून ८.०५ टक्के करण्यात आलं आहे.

हेही वाचा – शिंदे सरकारमधील पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरेंनी घेतली शपथ

Bank Holiday : नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै २०२३ मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली होती. याब यादीनुसार या महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये विविध कार्यक्रम किंवा उत्सवांमुळे एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये रविवारसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

निकृष्ट दर्जाचे शूज आणि चप्पल विकण्यास बंदी : केंद्र सरकारने शूज आणि चप्पलबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शूज आणि चप्पलवर क्वॉलिटी कंट्रोल ऑर्डर (QCO) लागू करण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी आज १  जुलैपासून होणार आहे. यानंतर सर्व फुटवेअर कंपन्यांनी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे नियम पाळणं आवश्यक असेल. म्हणजेच १ जुलै २०२३ पासून देशभरात निकृष्ट दर्जाच्या चपलांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button