breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार

मुंबई | प्रतिनिधी 
मुंबईत उद्या (१५ डिसेंबर) पासून इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने या संदर्भात माध्यम परिपत्रक काढण्यात आलेले आहे.“महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ला अनुसरून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा, परिपत्रक क्र. ईओजी/१७२७ दि. २९ सप्टेंबर २०२१ अन्वये ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आलेल्या आहेत.”

तसेच, “महाराष्ट्र शासन परिपत्रक दि. २९ नोव्हेंबर २०२१ ला अनुसरून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा, परिपत्रक क्र ईओजी/२२३४ दि. ३० नोव्हेंबर २०२१ अन्वये दिनांक १५ डिसेंबर २०२१पासून कोविड विषयक सूचनांचे पालन करून सुरू करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच परिपत्रक क्र.ईओजी/१२२ दि.०८ डिसेंबर २०२१ अन्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार १५ डिसेंबर २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत.” असं परिपत्रकात नमूद आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातीलही पहिली ते सातवीचे वर्ग उद्यापासून सुरू होणार –
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. मागील वर्षीच्या मार्चपासून हे वर्ग करोना परिस्थितीमुळे बंदच होते. शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग १ नोव्हेंबर पासूनच सुरु केले जाणार होते, परंतु ओमायक्रॉनच्या भीतीमुळे ते सुरू करण्यात आले नव्हते आणि हे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता पालिकक्षेत्रातील १ ली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरु होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी लोकसत्ताला दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button