TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी मैत्रीण शशिकला संशयाच्या फेऱ्यात

चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक

चेन्नई – तामिळनाडू सरकारने माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भातील चौकशी अहवाल सार्वजनिक केला आहे. या अहवालात जयललिता यांची जवळची मैत्रीण शशिकला यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, एक खागसी डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भातील चौकशीसाठी निवृत्त न्यायधीश ए.अरुमुघसामी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला ५०० पानी अहवाल सादर केला होता.

जयललिता (अम्मा) आणि शशिकला (चिनम्मा) यांच्यात चांगले संबंध नव्हते. त्यामुळे जयललिता यांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू न मानता याची गुन्हा दाखल होऊन चौकशी व्हावी असं अहवालात म्हटलं आहे. या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी असे निर्देश या अहवालातून देण्यात आले आहे.

५ डिसेंबर २०१६ ला चेन्नईतील अपोलो रुग्णालयात जयललिता यांचं निधन झालं. त्या दोन महिने रुग्णालयात दाखल होत्या. तसंच, त्यावेळी त्या मुख्यमंत्री पदीही होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं होतं. तसंच, जयललिता आजारी असल्यापासून त्यांचं निधन होईपर्यंत शशिकला या त्यांच्यासोबत होत्या.

अहवालात कोणावर संशय व्यक्त केला
व्हि.के.शशिकला- शशिकला या जयललिता यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या. त्या एकत्र राहत होत्या. आजारी पडल्यापासून ते मृत्यूपर्यंत शशिकला या जयललिता यांच्यासोबत होत्या.

डॉ.केएस शिवकुमार – यांनीच जयललिता यांच्यावर उपचार केले होते.
राधाकृष्णन- हे तत्कालीन आरोग्य मंत्री होते. तेच जयललिता यांच्या स्वास्थ्याबाबत देखरेख ठेवत होते.
सी.विजयभास्कर – जयललिता आणि राधाकृष्ण या दोघांच्या जवळचे अधिकारी म्हणजे सी.विजयभास्कर. जयललिता यांच्या स्वास्थ्याबाबत मेडिकल बुलेटिन जारी करत असत.

पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्त्वात जयललिता यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी जयललिता यांच्या निधनावरून प्रश्न उपस्थित केले होते. या मृत्यूप्रकरणी शशिकला आणि कुटुंबाकडून काहीतरी लपवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button